कोल्हार वार्ताहर- (साईप्रसाद कुंभकर्ण)
दिन दुबळ्या गोरगरीब शेतकरी शेतमजूर व दलितांचे प्रश्न विधानसभेत मांडणारे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून मी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना गेली 25 वर्षांपासून ओळखतो आमदार विखे पाटील यांच्या परिवारातील मी एक सदस्य आहे विखे पाटील माझे मोठे भाऊ आहेत संकटावेळी मला त्यांनीच मदत केली आहे मी कुठल्याही पक्षात असो पण आमदार विखे पाटील यांच्या मनात मी कायम राहतो." ये दोस्ती हम नही तोडेंगे" असे सांगून पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचा वारसा चालवत आमदार माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील गोरगरीब सर्वसामान्य साठी कार्य करीत आहे .कार्याने श्रीमंत होणे हे विखे घराण्याकडून शिकावे असे गौरव उदगार ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.राहाता तालुक्यातील कोल्हार येथे बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर प्राथमिक शाळा कोल्हार भगवतीपुर शाळा इमारत व व्यापारी संकुल इमारतीचा भूमिपूजन समारंभ ना.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राधाकृष्ण विखे पाटील होते यावेळी माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील ,तहसीलदार कुंदन हिरे, ट्रक संस्थेचे चेअरमन नंदकुमार राठी, कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडु पा., भगवती देवालय ट्रस्ट चे उपाध्यक्ष भाऊसाहेब खर्डे पाटील,
डॉ भास्करराव खर्डे ,धनंजय दळे, उद्योजक अजितसेठ कुंकुलोळ,
अशोकलाल असावा, भगवतीपुरचे माजी सरपंच रावसाहेब खर्डे, माजी उपसरपंच अशोक दातीर ,कोल्हार बुद्रुकच्या सरपंच निवेदिता बोरुडे, उपसरपंच सविता गोरक्षनाथ खर्डे ,बब्बाभाई शेख ,स्वप्निल निबे ,
पंढरीनाथ खर्डे , श्रीकांत खर्डे ,
संभाजी देवकर पाटील,उदय खर्डे,
समर्थ शेवाळे , नंदाताई तांबे ,शोभा लोखंडे ,राजेंद्र राठोड, डॉ श्रीकांत बेद्रे
कविता लहारे ,मुख्याध्यापिका देशमुख मॅडम , ज्ञानेश्वर गोंदकर शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर ,कोल्हार बुद्रुकचे ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे ,भगवतीपुर चे ग्रामविकास अधिकारी श्रीराम कोते,
साई कन्स्ट्रक्शन कंपनीचे संजय मुरलीधर धावणे , इलियासभाई शेख ,आबासाहेब राऊत आदीसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलतांना ना.सत्तार म्हणाले मुख्यमंत्रीपदासाठी उद्धवजींना अडीच वर्षे दिले पण उद्धवजी पाच वर्षे सत्तेत राहतील
तीस वर्षाची दोस्ती तुटली परंतु पंचवीस वर्षांपासून असलेली राधाकृष्ण विखे पाटील व माझी दोस्ती मात्र आजही कायम राहिली कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने मंदिर उघडण्या संदर्भात अद्याप निर्णय झाला नाही परंतु कोरोनाच्या तिसरा लाटेची खात्री करून मंदिर मस्जिद उघडण्यात बाबत सरकार विचार करेल असे सांगून ते म्हणाले गोरगरीब सामान्यांना घरे मिळतील यासाठी ड यादीतील घरकुलांना प्राधान्य द्यावे यावेळी बोलताना आमदार विखे म्हणाले ,25 वर्षांपासून पासून आमची मैत्री आहे पण राजकारणापलीकडे जाऊन विकास कामे केली तर विकास कामांना गती येते राजकारणातील अस्पृश्यता संपवली पाहिजे राजकारन कोतेपणाचे झाले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील ,आमदार अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले या वेळीं ना अब्दुल सत्तार यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री म्हस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोकलाल असावा यांनी केले.
Post a Comment