कोल्हार प्रतिनिधी- (साईप्रसाद कुंभकर्ण) साहित्यकार मुळात पत्रकार असतात. प्रेमचंद हे पत्रकार होते किंवा पत्रकार म्हणून त्यांना फार कमी लोक ओळखतात. खरंतर प्रेमचंद युगद्रष्टा पत्रकार होते असे मत प्रतिपादन अहमदनगर महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. साताप्पा चव्हाण यांनी केले. ते सात्रळ येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने आयोजित ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राच्या कार्यक्रमाप्रसंगी बीजभाषक म्हणून ते बोलत होते.पत्रकारांच्या मध्ये मानवता आणि करुणा असते,हे प्रेमचंद यांनी आपल्या साहित्यातून दाखवून दिले आहे. डॉ. साताप्पा चव्हाण पुढे म्हणाले, प्रेमचंद मराठी लिहीत होते मराठी बोलत होते. खरंतर प्रेमचंद भारतीय भाषांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील होते. आणि याच्या माध्यमातून ते राष्ट्रीय ऐक्याची भावना वाढीस लावण्यासाठी प्रयत्नशील होते. ज्याप्रकारे देशाला पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराचा मंत्र दिला, त्याचप्रमाणे प्रेमचंद यांनी आपल्या लेखणीतून देशाला साहित्यिक दृष्ट्या समृद्ध बनविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले संस्थेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ होते. ते आपल्या भाषणात म्हणाले लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था विविध महाविद्यालयातून अशा प्रकारच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करत असते. या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी देशातील आठ विद्यापीठातील विद्वान सहभागी झालेले आहेत,याचा मला आनंद आहे. प्रेमचंद काळाबरोबर चालणारे लेखक होते.आजही प्रेमचंद यांचे लेखन उपयोगी आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या केरळ केंद्रीय विद्यापीठातील प्राध्यापिका डॉ. सीमा चंद्रन यांनी प्रेमचंद यांच्या साहित्याचा सखोल मागोवा घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्या प्राध्यापक जयश्री सिनगर यांनी केले. यावेळी प्रोफेसर डॉक्टर सोमनाथ घोलप यांनी आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यालयाच्या विकासात्मक गोष्टींचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप यांनी मानले. तर पाहुण्यांचा परिचय डॉ. अनंत केदारे यांनी करून दिला. चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रासाठी शासकीय स्नातकोत्तर महाविद्यालय, छिंदवाडा येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. लक्ष्मीकांत चंदेला, महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी प्राध्यापिका राजश्री कदम, संभाजीराव कदम महाविद्यालय, सातारा येथील हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी चवरे आणि या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंडित बन्ने यांनी 'प्रेमचंद यांच्या साहित्यातील प्रवाह' या विषयावर साधक बाधक चर्चा घडवून आणली. चर्चासत्राच्या तृतीय सत्र आणि समारोप समारंभप्रसंगी गुरु घासीदास विद्यापीठ, कोणी, छत्तीसगड येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. रमेश कुमार गोहे यांनी चर्चासत्राचे अध्यक्षस्थान भूषविले, तर विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर येथील डॉ. दीपक तुपे आणि इंदिरा गांधी राजकीय स्नातकोत्तर महाविद्यालय, लखनऊ येथील डॉ. दिग्विजय नरायण यांनी विषय तज्ज्ञ म्हणून सहभाग नोंदविला. यावेळी पाहुण्यांचा परिचय डॉ. सरला तुपे यांनी करून दिला. एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आभार महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख प्रा.डॉ. भाऊसाहेब नवले यांनी मानले. सदरच्या चर्चासत्रासाठी देशभरातून 336 प्राध्यापक,संशोधक,हिंदी प्रेमी यांनी सहभाग नोंदविला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post