सात्रळ प्रतिनिधी (साईप्रसाद कुंभकर्ण/गणेश कुंभकर्ण) -
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील ( पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उत्सव समितीच्या वतीने श्रीमती सिंधुताई एकनाथराव विखे पाटील यांची ८६ वी जयंती तसेच प्रतिभावंत साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रा. नंदकिशोर भंडारी यांचे ऑनलाईन व्याख्यान
आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो.डाॅ. सोमनाथ घोलप होते. यावेळी महाविद्यालयात श्रीमती सिंधुताई एकनाथराव विखे पाटील व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप,कार्यालयीन अधिक्षक श्री. विलास शिंदे, श्री. महेंद्र तांबे, प्रा. विनोद पलघडमल, सुरक्षा अधिकारी श्री.मुसमाडे श्री. पवार आदी उपस्थित होते.
"करूया वंदनी या समाजसेवकांना" या विषयावर विचारपुष्प गुंफताना प्रा. नंदकिशोर भंडारी म्हणाले, श्रीमती सिंधुताई महाविद्यालयात आल्यानंतर कमवा आणि शिका योजनेतील विद्यार्थ्यांची आई म्हणून चौकशी करत. विद्यार्थी - विद्यार्थिनींच्या शिक्षणाकडे त्यांचे लक्ष असायचे. महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. त्या सर्वांशी प्रेमाने वागत. शिक्षणाचा उपयोग समाजातील तळागाळातील लोकांना पुढे नेण्यासाठी व्हावा असं त्यांचं नेहमी प्रांजळ मत असायचं.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो.डाॅ. सोमनाथ घोलप म्हणाले,श्रीमती सिंधुताई यांनी १९८८ मध्ये प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळाची स्थापना केली होती. या माध्यमातून ग्रामीण भागात महिलांच्या उत्कर्षासाठी उल्लेखनीय असे कार्य करून त्यांनी महिलांना प्रगतीच्या संधी उपलब्ध केल्या. त्यांनी या महिला मंडळासह प्रियदर्शनी सार्वजनिक ग्रंथालय आणि वाचनालय, ग्रामीण महिलांसाठी बिगरशेती सहकारी पंतसंस्था सुरू केली. सिंधुताई यांनी महिलांसाठी पहिली सहकारी पतसंस्था सुरू केली होती. प्रियदर्शनी या संस्थेच्या माध्यमातून महिलांसाच्या शिक्षणासाठी त्यांनी पुणतांबा इथं कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयं सुरू केली. महिला जनजागृतीसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम देखील केले. लोणी इथं प्रियदर्शनी ग्रामीण अध्यापक महाविद्यालयाची स्थापना केली. त्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलींच्या शिक्षणासाठी मोठ्या दिशा मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रो. डॉ. शिवाजी पंडित म्हणाले, सिंधुताई यांना महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारानं तसंच मातोश्री रमाबाई आंबडेकर आदर्श महिला पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. अण्णाभाऊंनी कथेबरोबरच कादंबऱ्यांतून जग बदलू पाहणाऱ्या लढवय्या नायकांची मांडणी केली.अण्णाभाऊंचे समग्र साहित्य सामाजिक क्रांतीचा उद्घोष करणारे असून जग बदलाच्या तत्वज्ञानाचे ते द्योतक ठरते.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. नवनाथ शिंदे केले. आभार प्रा. विनोद पालघडमल यांनी मानले.
सात्रळ महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व श्रीमती सिंधुताई विखे पाटील यांची जयंती साजरी
टीम नगरी वार्ता
0
Comments
Post a Comment