बाभळेश्वर वार्ताहर (गणेश कुंभकर्ण) -
राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने कंटेनर खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी बाभळेश्वर येथील चौकात घडली याबाबत समजलेली हकीकत अशी की राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या आरोपी जनार्दन चंद्रय बंडीवार वय- 46 राहणार -राहाता हा राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या ताब्यात होता प्रातविधीसाठी जातो असे सांगून अधिकार्यांपासून बाजूला येत बाभळेश्वर चौकात नगर-मनमाड राज्यमार्गावरील जाणाऱ्या कंटेनर खाली उडी मारून आत्महत्या केली पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर ही घटना सकाळी घडली त्यामुळे या घटनेची बाभळेश्वर येथे दिवसभर उलट उलट सुलट चर्चा चालू होती या घटनेबाबत लोणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणी पोलीस स्टेशनचे समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे मात्र याबाबत मृत व्यक्तीचे नातेवाईक रवींद्र आलापल्ली यांनी माझ्या मेव्हण्यावर खोटा गुन्हा दाखल केला व त्याचा घातपात केला असल्याचा गंभीर आरोप
राज्य उत्पादन शुल्क अधिका ऱ्यांवर केला आहे याबाबतचे सत्य लवकरच तपासाअंती बाहेर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Post a Comment