सात्रळ वार्ताहर-(साईप्रसाद कुंभकर्ण)
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील ( पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ ( ता. राहुरी ) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने "गंदगी मुक्त भारत तथा स्वच्छता कृती आराखडा अभियान" उपक्रम राबविण्यासंदर्भात मानव संसाधन विकास मंत्रालय,उच्च शिक्षण विभागाच्या,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषदेतर्फे सात्रळ महाविद्यालयास नुकतेच गौरव प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
सदरचे प्रशस्तीपत्रक महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड.श्री.बाळकृष्ण चोरमुंगे पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयाचे
प्र.प्राचार्य प्रो.(डॉ.) सोमनाथ घोलप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, महाविद्यालय विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. दिनकर घाणे, प्रा. डॉ. रामदास बोरसे,प्रा.डॉ. बाबासाहेब सलालकर, प्रो.(डॉ.) शिवाजी पंडित, प्रा. डॉ. नितीनकुमार पाटील उपस्थित होते.
सदरचे अभियान सात्रळ महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. दिनकर घाणे व त्यांचे समिती सदस्य यांनी तयार केलेल्या सुयोग्य नियोजननुसार राबविण्यात येणार आहे.
याप्रसंगी ॲड.श्री.बाळकृष्ण चोरमुंगे पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या "गंदगी मुक्त भारत" योजनेचा भाग म्हणून शिक्षण संस्थांमध्ये स्वच्छता कृती अभियान राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत. याअंतर्गत कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात मोठी मदत होणार असून सामाजिक आरोग्याच्या हेतूने हे अभियान उपयुक्त ठरणार आहे.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रोफेसर डॉ. सोमनाथ घोलप म्हणाले, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाचे शैक्षणिक आवार आरोग्यपूर्ण व स्वच्छ आहे. यामध्ये महाविद्यालयाचा हिरवाईने नटलेला परिसर, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन, पर्यावरण पूरक उपक्रम, जलसंवर्धन विषयक उपाययोजना इत्यादी उपक्रमांचे ऑडिट केले जाणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषदेतर्फे सात्रळ महाविद्यालयास गौरव प्रमाणपत्र प्राप्त
टीम नगरी वार्ता
0
Comments
Post a Comment