कोल्हार प्रतिनिधी (साईप्रसाद कुंभकर्ण / गणेश कुंभकर्ण)- राहाता तालुक्यातील दाढ बु.ग्रामपंचायतीच्या वतीने ५% अपंग कल्याण निधीच्या माध्यामातुन गावातील ७६ अपंग व दिव्यांग व्यक्तिंना रक्कम ३४१२५ किमतीच्या किराणा सामानाचे वाटप सरपंच सौ.पुनमताई योगेश तांबे, श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानचे श्री.योगेश तांबे ,उपसरपंच गोकुळ हरी गाडेकर,ग्रामविकासअधिकारी एस.पी. गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या वेळी ग्रापंचायत सदस्य वैशाली बनसोडे, संगिता पाळंदे, अंजली पाळंडे, लतालाई माळवदे, बेबी चव्हाण, मंगल कडलग,कल्याणी सातपुते, बेबीताई कदम,गाडेकर शुभांगी ,श्रीरामदास गाडेकर, मुंकुंद तांबे, किसन साळवे, सल्लाऊद्दीन इनामदार, भागवत तांबे, विजय तांबे, संतोष वाणी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी बापुसाहेब गाडेकर व भाऊराव तांबे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post