पाथरे प्रतिनिधी -(साईप्रसाद कुंभकर्ण/गणेश कुंभकर्ण)
राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील अविनाश रावसाहेब घोलप यांच्या गट नंबर ५६ मध्ये आज पहाटे दिड वर्ष वयाची मादी बिबट जेरबंद झाली. बिबट्या जेरबंद झाल्यावर पिंजर्याचा आवाज आल्यावर अविनाश घोलप यांनी वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर ताबडतोब म्हस्के यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली व नगरचे सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी रमेश देवखिळे, वनपरिक्षेत्र अधिकारी तेलोरे, वनपाल बी एस गाढे, यांना माहिती दिली.
गेल्या आठ दिवसांपासून या बिबट्याने परीसरात धुमाकुळ घातला होता. दोन शेळ्या व अनेक पाळीव कुत्रे यांचा फडशा पाडला होता. रविवारी संजय एकनाथ घोलप यांची शेळी ठार केली होती व सोमवारी विमल रावसाहेब घोलप यांची शेळी ठार केली होती.
काल सोमवारी सायंकाळी परत रावसाहेब घोलप यांच्या गोठ्याजवळ आला त्यांनी तातडीने म्हस्के यांना फोन करून पिंजर्याची मागणी केली. त्यानंतर रात्री उशिरा दहा वाजेपर्यंत पिंजर्याची उपलब्धता करून दिली व आज पहाटे बिबट्या जेरबंद झाला .
वनरक्षक सुरासे , प्राणीमित्र विकास म्हस्के यांनी बिबट्यास शासकीय रोपवाटिकेत रवानगी केली. लोणीचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. दशरथ दिघे यांनी त्याची पहाणी केली .
आज उष्णतेची लाट असल्याने बिबट्या व पिंजरा पाण्याने गार करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणुन पाथरे चे सरपंच उमेश घोलप , भास्करराव घोलप, चंद्रकांत घोलप, रावसाहेब घोलप, संजय घोलप, दिपक घोलप , वनरक्षक सुरासे, विकास म्हस्के यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून गर्दी पांगविण्यासाठी मदत केली.
Post a Comment