कोल्हार प्रतिनिधी : (साईप्रसाद कुंभकर्ण)
कोविड च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र औषधांचा तुटवडा जाणवत आहे. याची दखल घेत कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने 15 व्या वित्त आयोगातून माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या हस्ते सुमारे एक लाख ऐंशी हजारांचे औषधे व वैद्यकीय साहित्य कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आले कोविड च्या संसर्गामुळे राज्यात सर्वत्र औषधांचा तुटवडा जाणवत आहे कोल्हार येथील नागरिकांना औषधे व वैद्यकीय साहित्य उपलब्ध व्हावे या हेतूने कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्रास 15 वा वित्त आयोगातून एक लाख ऐंशी हजार रुपयांचे वैद्यकीय साहित्य व औषधे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त माजी सरपंच ॲड.सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सरपंच निवेदिता बोरुडे ,ग्रामपंचायत सदस्य शिवाजी निकुंभ , मनोज थेटे, ग्रामसेवक शशिकांत चौरे , गोरक्ष खर्डे , दिलीप बोरुडे , आरोग्य अधिकारी डॉ. संजय घोलप व कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व कोल्हार ग्रामपंचायतचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post