कोल्हार वार्ताहर-
डॉ तनपुरे सहकारी साखर कारखाना माजी चेअरमन व अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष व श्री.संतकवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोंडाजी साबळे पा उर्फ आण्णा यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले.त्यांच्यावर पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीच्या किनारी रामपुर हे रावसाहेब साबळेंचे गाव,गावाच्या राजकारणात कुशलतेने मार्गदर्शकाची भूमिका बजावत , राहुरी तालुक्यातील राजकारणातही त्यांचा दबदबा होता.
तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष,जिल्हा बॕकेंचे अध्यक्षपद त्यानी भुषविले होते , तसेच दि मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक या सह विविध संस्थेवर संचालक पद भुषविले होते. ते अतिशय सहनशील व मुरब्बी,व अभ्यासु राजकारणी म्हणून परिसरात व तालुक्यामध्ये परिचित होते. त्यांना धार्मिक कामाची आवड असल्याने संत महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट स्थापना करुन गेल्या तीस वर्षापासुन ते ट्रस्टचे अध्यक्ष होते.
आण्णांच्या पच्छात पत्नी ,दोन मुले ,मुलगी ,सुना ,नातवंडे असा परीवार आहे.रामपुर गावचे उपसरपंच राहुल साबळे व राजेंद्र साबळे यांचे ते वडील होत.
त्यांच्या जाण्याने त्यांच्या साबळे कुटुंबियांसह संपूर्ण रामपुर गावांवर शोककळा पसरली आहे .
Post a Comment