कोल्हार वार्ताहर-(साईप्रसाद कुंभकर्ण/गणेश कुंभकर्ण)
कोरोणा महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या एक महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व व्यवहार व सर्व कामे ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही त्यामुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे ,अशा परिस्थितीत रोजंदारीवर काम करणाऱ्या गरीब व गरजू मजुरांच्या कुटुंबीयांना ह्या लॉकडाऊन च्या कालावधीत सामाजिक दायित्वाचे भान ठेवून उद्योजक डि.बी. जगताप व उद्योजक निखिल जगताप यांनी मजुरांना किराणा सामान वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले.
याशिवाय कोरोना महामारीच्या कालावधीत सध्या कोरोना योद्धे म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना व इतर कोविड योद्धांना 400 फेसशिल्ड चे वाटप त्यांनी केले. तसेच लोणी ,कोल्हार खुर्द, तांभेरे येथील कोविड सेंटरला आर्थिक मदत देऊ केली आहे. उद्योजक डि.बी. जगताप व उद्योजक निखिल जगताप या पितापुत्रांनी दाखवलेल्या या सामाजिक दायित्वाबद्दल व स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
उद्योजक डी.बी.जगताप व निखिल जगताप यांनी जपला माणुसकी धर्म.
टीम नगरी वार्ता
0
Comments
Post a Comment