कोल्हार वार्ताहर :(साईप्रसाद कुंभकर्ण / गणेश कुंभकर्ण )
कोविडच्या दुसऱ्या लाटेत प्रवरा परिसरात रुग्णांची वाढ होत असताना रुग्णांच्या उपचारासाठी आ.राधाकृष्ण विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी येथे प्रवरा कोविड सेंटर सुरु करण्यात आले.
या कोविड सेंटर मध्ये उपचार सुरु असलेल्या रुग्णांना मदत म्हणून सामाजिक बांधीलकीने प्रवरा कोविड सेंटर मधील रुग्णांच्या उपचारासाठी राहाता तालुक्यातील बांधकाम व्यवसायिक दिपक धावणे,निखिल जगताप,शिवाजीराव येवले,नंदकुमार माळवदे,रामदास कल्हापुरे यांनी एकत्रित येऊन अडीच लाख रुपयांची मदत आ.राधाकृष्ण विखे पा.यांच्याकडे सुपुर्त केली.
प्रवरा कोविड सेंटर च्या माध्यमातून कोव्हिड रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा व आधार मिळत असुन या कोव्हीड सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या उपचारांकरीता मदतीचे हात समाजातील विविध घटकांनी पुढे केले आहेत.
युवा उद्योजक शंकर तांबे,दिपक धावणे,संतोष कडू,हरीभाऊ घोगरे,दादासाहेब धावणे ,बापूसाहेब कांडेकर यांनी 15 बेड साईड लॉकर आ.राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे सुपूर्द केले.
याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के ,डॉ.प्रदीप दिघे ,कोव्हीड केअर सेंटरचे समन्वयक डॉ धनंजय धनवटे ,डॉ. किरण आहेर आदी उपस्थित होते.
कोविड संकटकाळात बांधकाम व्यवसायिकांनी जपली सामाजिक बांधीलकी
टीम नगरी वार्ता
0
Comments
Post a Comment