कोल्हार प्रतिनिधी- (साईप्रसाद कुंभकर्ण/गणेश कुंभकर्ण)
संपुर्ण महाराष्ट्रात कोविड च्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नगर जिल्ह्यात ही कोविड रुग्णांची झपाट्याने वाढ होत होती.नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील व प्रवरा परिसरातील नागरीक हि कोविड ने हैरान झाले होते. ऑक्सिजन ची कमतरता त्यानंतर व्हेंटीलेटर बेड,अॉक्सीजन बेड ची शोधाशोध त्यामुळे गोरगरीब जनतेचे खुप मोठ्या प्रमाणात हाल होत होते.
कुठे बेड मिळेल ,कोठे इंजेक्शन मिळेल असे अनेक प्रकारचे प्रश्न या परिस्थितीत उपस्थित होत होते याच वेळी आपण ही या समाजाच देण लागतो या उद्देशाने प्रवरा परिसरातील जनतेची सेवा करण्यासाठी अनेक युवक एकत्र येऊन खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तांडव ग्रुप नावाने एक संघटन उभे करून कोविड रुग्णांना काही वैद्यकीय सेवेची माहिती तसेच कोठे बेड, ऑक्सिजन, अँबुलन्स,व्हेंटिलेटर,प्लाझ्मा मिळेल याची माहिती तसेच तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, रुग्णाला प्लासमा मिळवून देणे,कोविड रुग्ण व नातेवाईक यांना मोफत जेवण उपलब्ध करून देत आहेत. एक आदर्श या युवकांनी अनेक युवकांसमोर उभा केला आहे . तांडव ग्रुपच्या या उपक्रमाला परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच सचिन शिरसाठ यांनी हि कोविड रुग्ण व नातेवाईक यांना मोफत जेवण उपलब्ध करून दिले त्यांचे हि कामाचे कौतुक होत आहे.
तांडव ग्रुपचे अविनाश खर्डे,निखिल भोसले ,नयनराज खर्डे, प्रदीप हुरे,किशोर गोरे,गणेश जाधव,रवी आहेर,संदीप गायकवाड,अमोल खर्डे ,सागर जाधव,निलेश देशमुख,सोमनाथ भालसिंग,निलेश म्हस्के, चारुदत्त पवळ,अवि लबडे,रोहित खर्डे आदी युवक दिवस -रात्र जनतेची सेवा करत आहेत.
Post a Comment