कोल्हार वार्ताहर-(साईप्रसाद कुंभकर्ण )
कोल्हार येथील युवा व्यावसायिकांनी रमजान ईद निमित्त 100 हून अधिक मुस्लिम बांधवांना मास्क ,सॅनिटायझर व उपरणे भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या मुस्लिम बांधवांनी या प्रतिबंधक साहित्याचा स्वीकार करून त्याचा वापर करण्याचा संकल्प केला याप्रसंगी बाळासाहेब शिंगवी , संतोष राकेचा , पंकज गुलाटी ,अब्रार आत्तार ,मयुर आसावा यांनी उस्फूर्तपणे हा उपक्रम राबविला या कार्यक्रमासाठी कोल्हार भगवतीपुर व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी ,संजय आसावा , बब्बाभाई शेख ,श्याम गोसावी,सुभाष शिंगवी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post