लोणी वार्ताहर :(साईप्रसाद कुंभकर्ण/गणेश कुंभकर्ण )
आ.राधाकृष्ण विखे पा.यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुक्यातील लोणी येथे सुरु करण्यात आलेल्या प्रवरा कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मदतीकरिता साखर कामगार सभा आणि कामगार युनियनच्या वतीने २ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश आ.राधाकृष्ण विखे पा.यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. याप्रसंगी कामगार युनियनचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर, कामगार सोसायटीचे अध्यक्ष निवृत्ती तांबे, विखे पाटील कारखान्याचे कामगार संचालक पोपट वाणी, दिलीप कडू,प्रमोद रहाणे,दिघे सर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर रुग्णालयाला विविध क्षेत्रांतून मदतीचा ओघ हा सातत्याने सुरूच असून प्रवरा कोविड सेंटर मधील अनेक रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post