कोल्हार वार्ताहर-(साईप्रसाद कुंभकर्ण/गणेश कुंभकर्ण)
आ.राधाकृष्ण विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या राहाता तालुक्यातील लोणी येथील
प्रवरा कोव्हीड केअर सेंटर मधील रूग्णांच्या मदतीकरिता अनेक लोक धावून येत आहेत. जमेल ती मदत सर्व क्षेत्रातून होत आहे.
ह्या रुग्णांच्या उपचाराकरिता ट्रक वाहतूक सहकारी संस्थेच्या वतीने प्रवरा कोव्हीड सेंटरला १ लाख ५१ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.
या संस्थेच्या वतीने चेअरमन नंदूशेठ राठी, संचालक साहेबराव दळे, संभाजीराव देवकर, पिरमंहमद पटेल, व्यवस्थापक जालिंदर खर्डे, प्रकाश तांबे यांनी हा मदतीचा धनादेश आ.राधाकृष्ण विखे यांच्याकडे सुपुर्त केला.
त्याचबरोबर कै. केदारनाथ बन्सीलाल राठी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने राठी परिवाराच्या वतीने ५१ हजार रुपयांची मदत प्रवरा कोव्हीड सेंटरला करण्यात आली आहे.
ही मदत देताना नंदूशेठ राठी, राजूशेठ राठी, मनोज राठी, गोपाल राठी, रुपेश राठी, सुमित राठी, द्वारकेश व गौरी राठी आदी उपस्थित होते
ट्रक वाहतुक संस्थेकडूक कोविड सेंटरला १ लाख ५१ हजारांची मदत
टीम नगरी वार्ता
0
Comments
Post a Comment