शिर्डी प्रतिनिधी- (गणेश कुंभकर्ण)
विरोधी पक्षनेते पद संविधानिक पद आहे.या पदावर असलेल्या व्यक्तिबाबत शिवसेनेच्या आमदाराने गलिच्छ वक्तव्य करून स्वतःच्या पक्षाचीच प्रतिमा मलिन केली आहे.आघाडी सरकारमध्ये थोडी जरी चाड शिल्लक असेल तर त्यांनी त्या आमदारांवर गुन्हा दाखल करावा आशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
आ.विखे पाटील यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेचे आ.संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी त्यांना तातडीने समज देण्याची गरज होती.पण त्यांना कुठेतरी पाठीशी घालण्याच प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून होत असल्याचा आरोप आ.विखे पाटील यांनी केला.
आघाडी सरकारचे नेते नैतिकतेच्या गप्पा मारून केंद्र सरकारवर टिका करते.परंतू सताधारी पक्षाचे आमदारच जेव्हा पातळी सोडून विरोधी पक्षनेत्यांवर वक्तव्ये करतात हे अत्यंत दुर्दैवी आहे.विरोधी पक्षनेते पद संविधानिक दर्जा असलेले पद आहे.त्या पदावर असलेल्या व्यक्तीबाबत हीन दर्जाचे वक्तव्य करणाऱ्या आमदारावर कारवाई करण्याची नैतिकता महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी दाखवावी असे विखे पाटील म्हणाले.
Post a Comment