शिर्डी प्रतिनिधी - (गणेश कुंभकर्ण)


भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील परीवाराने  नगर जिल्ह्याकरीता ३०० रेमडीसिव्हर इंजक्शनची विनामूल्य उपलब्धता करुन देत मोठा दिलासा दिला आहे.राहाता तालुक्यात  एक हजार रुग्णांकरिता  सुविधा होईल आशी आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आ.विखे पाटील यांनी सांगितले.


जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोव्हीड रूग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढल्याने रेमडीसिव्हर इंजक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली.परंतू इजक्शनंचा तुटवडाही मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.वाढीव दराने होत असलेल्या विक्रीतून होत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी अडचण दूर करण्यासाठी आ.विखे आणि खा.सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यात तिनशे रेमडीसिव्हर इंजक्शनची उपलब्धता करून दिली. 


तिनशे पैकी शंभर इंजक्शन येथील सुपर स्पेशालीटी हाॅस्पिटल शिर्डी, प्रवरा ग्रामीण रुग्णालय आणि नगर येथील सिव्हील रुग्णालयास  देण्यात येणार आहेत.

शिर्डी येथील साई सुपर स्पेशालीटी हाॅस्पिटल मध्ये शंभर इंजक्शन आ.विखे पाटील यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे आणि रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.याप्रसंगी साई संस्थानचे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर माजी नगराध्यक्ष कैलास कोते अभय शेळके नगररसेवक सुजित गोंदकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद म्हस्के आदीसह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

आ.विखे पाटील म्हणाले की,कोव्हीडच्या रुग्णांची वाढती संख्या पाहाता राहाता तालुक्यात सर्व रुग्णालय मिळून आता एक हजार रुग्णांची व्यवस्था होईल आशा पध्दतीची यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न हा बहुदा राज्यातील पहीला प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले.यामध्ये प्रामुख्याने आॅक्सिजन बेड आणि आॅक्सिजनचा पुरवठा  सुरळीत राहील यावर सर्व विभागांनी लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post