कोल्हार प्रतिनिधी- (गणेश कुंभकर्ण)
कोल्हार येथे बेलापुर रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळी ११ नंतर नियमांचे उल्लंघन करुण विनाकारण व विना मास्क फिरणार्या व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करीत त्यांची रॕपीड अॕटींजन टेस्ट करण्यात आली.
कोल्हार पोलीस व कोल्हार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर पथक यांनी अश्या विनाकारण व विनामास्क फिरणार्या १० व्यक्तिंची कोविड ॲंटीजन टेस्ट केली, ह्या दहा ही व्यक्तींची ॲंटीजन टेस्ट निगेटिव्ह आली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय घोलप यांनी दिली.ह्या कारवाईमुळे कोल्हार बु.च्या रस्त्यावर दुपारनंतर विनाकारण फिरणारी व्यक्ती दिसली नाही .
कोल्हार व भगवतीपूर परिसरात कोविड रुग्णांची वाढत असलेल्या संख्येच्या पाश्वभुमीवर कडक निर्बंध असताना देखील विनाकारण व मास्क न लावता फिरणार्या व्यक्तिंवर लॉकडाऊन असे पर्यत हि कारवाई होणार असल्याचे पोलिस व डॉक्टर पथकाकडून सांगण्यात आले.
Post a Comment