लोणी प्रतिनिधी -(गणेश कुंभकर्ण)
राहाता तालुक्यात कोविड रुग्णांची वाढ होत असुन राहाता तालुक्यातील लोणी येथे देखील मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आसल्याने नागरिकांनी प्रशासनाने सांगीतलेले नियम व सुचना पाळाव्यात ह्यासाठी पोलिसांनी रुट मार्च काढुन जनजागृती केली.
दि. 23/4/2021 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस अधीक्षक अहमदनगर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी यांचे मार्गदर्शनाखाली लोणी बस स्टॅन्ड ते सोनार गल्ली ,वेताळबाबा चौक, लोणी खुर्द या मार्गे रूट मार्च घेऊन वाढता कोरोना प्रादुर्भाव व त्यापासून आपला व आपल्या कुटुंबियांचा बचाव कसा करायचा व शासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बाबत रुट मार्च घेऊन स्पीकर द्वारे जनजागृती करण्यात आली. सदर वेळी लोणी पोलीस स्टेशनचे 2 अधिकारी 15 पोलीस अंमलदार व 15 होमगार्ड रूट मार्च साठी हजर होते.
Post a Comment