बाभळेश्वर प्रतिनिधी-(गणेश कुंभकर्ण )-
राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव व श्रीरामपूर येथील दारुबंदी उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक क्र. २ यांनी चार दिवस बाभळेश्वर परीसरात साफळा रचून महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेली गोवा राज्यातील ७४ लाख ८८८ हजार रुपयांचे दारुचे १ हजार २०० बाॅक्ससह आयशर ट्रक असा एकूण ९४ लाख ८८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात केला.
याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. कारवाई २७ रोजी सकाळी दहाच्या सुमारास करण्यात आली. गुन्हा मात्र रात्री ११ वाजता दाखल करण्यात आला.
नगर येथील दारुबंदी विभागास अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार श्रीरामपूरच्या भरारी पथक क्र दोन या विशेष पथकाने ४ दिवसापासून बाभळेश्वर, अस्तगाव परिसरात सापळा लावला होता.
दि.२७ एप्रिल २०२१ रोजी सकाळी नगर-मनमाड रोडवरील अस्तगाव फाटा येथे गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली अवैध मद्याची वाहतुक करणारा आयशर ट्रक (एम.एच.१८ बी.जी.५२७४)ची तपासणी केली असता ७४ लाख ८८ हजार रुपये किंमतीच्या व्हिस्कीच्या १८० मि.ली.च्या ५७ हजार ६०० बाटल्या (१२०० बॉक्सेस), तसेच २० लाख रुपये किंमतीचा आयशर कंपनीचा ट्रक असा ९४ लाख ८८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गहु देविसिग मिल (वय-३५ वर्ष रा. रामुखेडी खुडेल जि.इंदोर, मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.
Tags
बाभळेश्वर
Post a Comment