संगमनेर प्रतिनिधी -
संगमनेर तालुक्यातील औरंगपुर या गावातील श्री संजय विठ्ठल तळोले यांची अहमदनगर जिल्ह्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक गुप्तचर समितीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. या संबंधीचे पत्र त्यांना जिल्ह्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक गुप्तचर समितीच्या जिल्हाध्यक्ष श्री. संजय चव्हाण यांनी दिले.
श्री संजय विठ्ठल तळोले हे सदैव लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सामाजिक कार्यात सक्रीय सहभागी असतात.यात त्यांना त्यांची पत्नी सौ. शोभाताई तळोले यांची मोलाची साथ लाभत असते. या निवडीमुळे त्यांना आणखी सक्रियपणे समाजातील विविध लोकांना मदत करता येणार आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल परिसरातून अभिनंदन व्यक्त केले जात आहे. या प्रसंगी प्रवरा शिक्षण संथेचे संचालक श्री भागवत पाटील घोलप,अमृतवाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल शिंदे,त्यांचे बंधू श्री दत्तात्रय पाटील तळोले, सामाजिक कार्यकर्ते श्री दिगंबर थोरात, श्री. रवींद्र बागडे, श्री विवेक पाटील दिघे यांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment