लोणी प्रतिनिधी -
लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्यार्थी विकास महामंडळाच्या वतीने जागतिक मराठी भाषा गौरव दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला.ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन व्याख्याते व कवी अमर हजारे उपस्थित होते.
हजारे हे सामाजिक क्षेत्राबरोबरच मराठी साहित्य क्षेत्रात सुद्धा गाढा अभ्यास असणारे आणि समाजातील विविध घटकांचे प्रश्न आपल्या कवितेतून मांडनारे कवी म्हणून ओळखले जातात.
या प्रसंगी कवी अमर हजारे यांनी मराठी भाषेविषयी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, ‘मराठी ही आपली मातृभाषा आहे. मातृभाषेतील शिक्षण हे आपल्या संपूर्ण कारकिर्दीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देते. इंग्रजीच्या जाळ्यात मराठी भाषा दुर्लक्षित झाली,मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे. हजारे यांनी जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यामागील भूमिका मांडताना मातृभाषेचे कार्य आणि महत्त्व स्पष्ट केले.व तसेच काही कवितांचेही वाचन केले.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.गुल्हाणे सर,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.सचीन अनाप,प्रा.संदिप तुरकणे,प्रा.पंकज चित्ते, व महाविद्यालयातील विद्यार्थी ऑनलाइन गुगल मीट द्वारा उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय कासार यांनी केले.तर प्रा.सचीन अनाप यांनी आभार मानले.
Post a Comment