कोल्हार : सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त कोल्हार येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ निवेदिता बोरुडे, भगवतीपुर ग्रामपंचायतचे सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, गोरक्षनाथ खर्डे , आबासाहेब राऊत, पंढरीनाथ खर्डे ,संतोष लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्करराव बोऱ्हाडे यांनी केले.तर स्वागत कोल्हार सराफ सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष दिपक देडगावकर यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ.श्रीकांत बेद्रे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी रवींद्र लोळगे, जीवनराव ढाळे, सोमनाथ आडाणी, केतन लोळगे, संतोष लोळगे, प्रकाश डहाळे,सतीश लोळगे, सुभाष आडाणी,हेमंत उदावंत, सचिन लोळगे,शंकर आडाणी,तुषार दहिवाळ, अनिल डहाळे, ओंकार ढाळे, सुनील बेल्हेकर, रामा दहिवाल आदींनी अथक परिश्रम घेतले.
Post a Comment