कोल्हार प्रतिनिधी :
राहुरी तालुक्यातील रामपूर येथील रहिवासी व लोकनेते पदमभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील ,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री रामेश्वर विद्यालय चणेगाव , ता - संगमनेर या विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक आणि राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री अनिल किसन लोखंडे सर यांना नुकताच National Institute of educational planning and Administration - (NIEPA ) संस्था , नवी दिल्ली यांच्या अंर्तगत राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाची(NCF )उद्दिष्टे व ध्येय साध्य करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शक तत्वानुसार -National Centre For School Leadership - (NCSL ) मार्फत संचलित व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक शैक्षणिक संशोधन व प्रशासन संस्था औरंगाबाद - (MIEPA) द्वारे आयोजित राष्ट्रीय शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कोर्स (PSLM ) - Planning On School Leadership and Management हा अतिशय महत्त्वाचा संपूर्ण देशातील सर्व माध्यमांच्या शाळा प्रमुख व मुख्याध्यापकांसाठी शालेय गुणवत्तावाढ व विकास, दैनंदिन प्रशासन तसेच आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्मिती होण्यासाठी उपयुक्त दहा आठवड्यांचा आठ मोड्युल असलेला मानांकित ऑनलाईन अभ्यासक्रम प्रशिक्षण कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल "National Centre for School Leadership" - (NCSL) व "National Institute of Educational planning and Administration." - (NIEPA ) संस्था , नवी दिल्ली यांचेमार्फत अनिल लोखंडे सरांना राष्ट्रीय स्तरावरील प्रमानपत्र देऊन गौरविण्यात आले .
त्यांनी आतापर्यंत विविध विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण व डिप्लोमा इन स्कुल मॅनेजमेंट हा देखील कोर्स केलेला आहे , महाराष्ट्र राज्य प्राधिकरण व शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (SCERT) मार्फत आयोजित शिक्षक नवोपक्रम स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळविलेला आहे
यामुळे अनिल किसन लोखंडे सरांचे अभिनंदन माजी मंत्री ,आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील , माजी जिल्हा परिषद अध्यक्षा .सौ. शालिनीताई विखे पाटील ,अहमदनगर जिल्हा दक्षिण लोकसभेचे खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील , माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील , संत महिपती देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब साबळे पाटील ,संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे पाटील ,संस्था सहसचिव भारत घोगरे साहेब ,रामपूरच्या सरपंच सौ मीना मोरे ,उपसरपंच श्री राहुल साबळे पाटील ,रामपूर सोसायटी चेअरमन ज्ञानदेव लोखंडे ,भाऊसाहेब साबळे , निवृत्ती खळदकर ,भगीरथ नालकर ,अरुण भोसले ,प्रकाश साबळे व सर्व स्टाफ मेंबर्स , ग्रामस्थ ,पालक व विद्यार्थी यांनी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
Post a Comment