कोल्हार प्रतिनिधी :-
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रवरा हायस्कूल येथे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली .या स्पर्धेदरम्यान राज्यातील शिवकालीन विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यां द्वारे बनविण्यात आल्या. पाचवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी गटागटाने किल्ले बनवण्यासाठी उत्साहाने सहभागी झाले .उपलब्ध चिखलमाती दगड विटा इत्यादी साहित्याचा वापर करून अगदी खरे वाटण्याजोगे या किल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार केल्या . उत्कृष्ट किल्ल्यांची प्रतिकृती बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने बक्षिसे देण्यात आली तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले .
![]() |
तत्पूर्वी शिवचरित्र व्याख्याते साईप्रसाद कुंभकर्ण यांनी विद्यार्थ्यांना ‘‘दुर्ग संवर्धन काळाची गरज ‘ याविषयावर व्याख्यान दिले. तसेच व्याख्यानाच्या माध्यमातून शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांची माहिती विदयार्थ्यांना करून दिली तसेच किल्ल्यांचे प्रकार, किल्ल्यांचे महत्त्व, भौगोलिकदृष्ट्या किल्ल्यांची रचना ,जलदुर्ग ,भुईकोट किल्ले, डोंगरावरील किल्ले याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली . त्याचप्रमाणे कुंभकर्ण यांनी शिवाजी महाराजांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला .
पत्रकार, शिवचरित्र व्याख्याते साईप्रसाद कुंभकर्ण यांना नुकताच युवा भूषण हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते मिळाला म्हणून त्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला .
दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त विद्यालयांमध्ये शिवप्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री अशोक असावा ,श्री आबासाहेब राऊत, श्री महेंद्र खर्डे ,श्री सुनील शिंदे ,प्रशांत खर्डे यांनी केले .
उत्कृष्ट किल्ले बनवणार्या विद्यार्थ्यांचा यावेळी बक्षीस समारंभ पार पडला . सीनियर गटात इयत्ता नववी मुली (सिंहगड) द्वितीय क्रमांक, इयत्ता आठवी मुले (रायगड) तृतीय क्रमांक, इयत्ता आठवी मुली (सिंधुदुर्ग), आणि इयत्ता नववी मुले (पन्हाळा )त्याचप्रमाणे जुनियर गटामध्ये प्रथम क्रमांक सातवी मुले (प्रतापगड) ,द्वितीय क्रमांक मुले (सुवर्णदुर्ग ),तृतीय क्रमांक इयत्ता सहावी मुले (भुईकोट) किल्लाला मिळाला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निंबाळकर सर , श्री कडू एस सर, श्री काळे सर, आहेर सर ,म्हस्के सर यांनी परिश्रम घेतले. शाळेचे प्राचार्य श्री सुधीर मोरे सर यांनी स्पर्धेत यशस्वी असलेल्या विध्यार्थांचे अभिनंदन केले .
Post a Comment