कोल्हार प्रतिनिधी:
कोल्हार भगवतीपुर येथे शिवजयंती उत्सव विविध उपक्रमाने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोल्हार बेलापूर रोड वर छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोल्हार भगवतीपुर शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. ढोल ताशाच्या गजरात व छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करणाऱ्या गगनभेदी घोषणा देत शिवछत्रपतींच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शोभेचे दारूकाम व तोफांच्या आवाजाने आसमंत दुमदुमला होता. शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा ,दीपोत्सव, मैदानी खेळाचे प्रात्यक्षिक आदी कार्यक्रम संपन्न झाले.
तसेच कोल्हार बसस्थानकासमोर शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे गुरुकुल संपदा स्कूलमध्ये तलवार बाजी, दांड पट्टा फिरविणे आदी मर्दानी खेळाचे प्रात्याक्षिक व शिवरायांच्या जीवनातील प्रसंगाचे देखावे व नाटक विद्यार्थ्यांनी सादर केले गुरुकुल संपदा स्कूल मधील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गुरुकुल संपदा स्कूल मधील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सुधीर आहेर व सचिव सारिका आहेर व स्कूलचे शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.तर प्रवरा हायस्कूल मध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन शिवकालीन विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवल्या प्रवरा हायस्कूल मधील किल्ले बनवा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रवरा हायस्कूलचे प्राचार्य श्री सुधीर मोरे सर ,निंबाळकर सर, कडू सर ,काळे सर ,म्हस्के सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment