कोल्हार प्रतिनिधी -

 कोल्हार येथे नव्याने सुरू झालेल्या साईसुमन चहा ह्या दुकानाचे उद्घाटन माजी मंत्री,आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते  दिनांक १९  रोजी संपन्न झाले.

राहाता तालुक्यातील  लोणी येथील सुप्रसिद्ध साईसुमन चहाचे संचालक रावसाहेब मच्छिंद्र धनवटे व कुटुंबानी राहाता तालुक्यातील कोल्हार येथे हा चहाचा व्यवसाय सुरू केला. साईसुमन चहाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष अशोक असावा ,आबासाहेब राऊत,बालरोग तज्ञ सुनिल खर्डे, भगवतीपूर ग्रामपंचायतचे  सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे,गोरक्षनाथ खर्डे,प्रकाश पाटील,अशोक घोलप सर, साईप्रवरा अर्बन मल्टिपल निधीचे  चेअरमन वसंतराव खर्डे , तनपुरे कारखान्याचे संचालक महेश शिरसाठ, साईछत्र हॉटेलचे मालक गणपतशेठ भोसले, संदीप लोखंडे, संभाजीराजे देवकर,श्रीकांत बेंद्रे,शाबीर शेख,पंढरीनाथ खर्डे,प्रविण लोखंडे, सुमित धनवटे,संतोष धनवटे,गोपाल धनवटे,अजय धनवटे,अस्लम सय्यद,संजय बाबरे,उमेश वानखडे,अंकुश धनवटे आदी मान्यवर उपस्थित होते.




 माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोगत व्यक्त करून  साईसुमन चहाचे  संचालक रावसाहेब  धनवटे यांचे अभिनंदन करून, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

साईसुमन चहाची कोल्हार येथील हि  दुसरी शाखा असुन धनवटे कुटुंबाचा हा तीन पिड्यांचा व्यवसाय असुन ह्या चहाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वोत्तम व दर्जेदार चहा तसेच स्वच्छ भांडी, दर्जेदार दूध, आर.ओ.फिल्टरचे पाणी ग्राहकांना दिले जाते तसेच आर.ओ. फिल्टरचे पाणी चहा बनवण्यासाठी वापरले जाते. व चहा पिणार्या ग्राहकांना बसण्यासाठी छान व्यवस्था व आजुबाजुला असलेले भिंतीवरील सुविचार ग्राहकांचे लक्ष वेधुन घेतात अशा प्रकारचे वैशिष्ट्य असल्यामुळे ग्राहक हा चहा घेणे पसंत करतात.

जाहीरात-



 








Post a Comment

Previous Post Next Post