अहमदनगर :-
ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येत असलेला "जिल्हास्तरीय शिवचरित्र व्याख्याते पुरस्कार 2021" कोल्हार भगवतीपुर येथील शिवचरित्र व्याख्याते ,इतिहास अभ्यासक,पत्रकार साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण यांना घोषित झाला असून दिनांक 15 फेब्रुवारी रोजी शिर्डी येथील साई पालखी निवारा या ठिकाणी पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन ग्रामीण पत्रकार संघ ,महाराष्ट्र राज्य च्यावतीने पुरस्कार दिले जातात.
साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण यांनी आजपर्यंत विविध वृत्तपत्रातून,साप्ताहिकातून तसेच मासिकातून गड-किल्ले ,इतिहास विषयक लिखाण प्रसिद्ध केले असून विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत. कोल्हार भगवतीपुर येथील दैनिक पुढारीचे पत्रकार प्रमोद मधुकर कुंभकर्ण यांचे ते चिरंजीव आहेत.
Post a Comment