कोल्हार वार्ताहर :-

कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.निवेदिता दिलीप बोरुडे यांची तर उपसरपंचपदी सौ.सविता गोरक्षनाथ खर्डे  यांची बिनविरोध निवड झाली 

निवडणूक निर्णय अधिकारी एस बी गायकवाड यांच्या उपस्थितीत सर्व नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली सरपंच पदासाठी निवेदिता बोरुडे यांच्या नावाची सूचना अँड.सुरेंद्र खर्डे पाटील  यांनी केली तर उपसरपंच पदासाठी सविता गोरक्षनाथ खर्डे यांच्या नावाची सूचना ज्ञानेश्वर खर्डे पाटील यांनी केली ह्या सूचनेला सर्वानुमते मान्यता देण्यात आल्याने निवड बिनविरोध झाली सरपंच व उपसरपंच दोन्ही पदावर महिला विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीत महिलाराज पंचायतीचा कारभार पाहणार आहे कोल्हार व भगवतीपुर या दोन्ही ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाली होती. कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीत सहमतीचे राजकारण होऊन विखे-पाटील गटाचे आठ सुरेंद्र खर्डे पाटील गटाचे आठ व एक अपक्ष असे एकूण 17 सदस्य बिनविरोध निवडून आले पण सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत सरपंच पद मात्र सुरेंद्र खर्डे  गटाकडे आले तर उपसरपंचपद विखे पाटील गटाकडे आले 

निवडणूक निर्णय अधिकारी एस बी गायकवाड यांच्या उपस्थिती सरपंच, उपसरपंच यांची निवड बिनविरोध झाली यावेळी मावळत्या सरपंच सौ. रीनाताई खर्डे यांच्या हस्ते  

नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामसेवक शशिकांत चौरे कोल्हार आऊट पोस्ट चे सहायक फौजदार बाबासाहेब लबडे, गोरक्ष खर्डे पाटील, पंढरीनाथ खर्डे पाटील, आबा राऊत, श्रीकांत बेंद्रे ,स्वप्निल नीबे आदींसह सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.




 


Post a Comment

Previous Post Next Post