कोल्हार : साडेतीन शक्तीपीठ असलेल्या माता भगवतीच्या यात्रा उत्सवास गुरुवार दिनांक 28 जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव यावर्षी साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष सयाजी उर्फ भाऊसाहेब रघुनाथ खर्डे यांनी दिली.
याबाबत झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय झाल्याचे सांगताना ते म्हणाले की ,दरवर्षी पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमा असा महिनाभर हा उत्सव साजरा होतो. मंदिर परिसरात खेळणी, हलवाई ,सौंदर्य प्रसाधनांची दुकाने लावण्यास परवानगी नाही.
काल यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी देवीला अभिषेक, शेंदुर लेपन, देवीची विधिवत पूजा व आरती ,सायंकाळी देवीची सवाद्य पालखीची मिरवणूक आदि धार्मिक कार्यक्रम गावातील प्रमुख मान्यवरांच्या व सर्व विश्वस्त आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
शोभेचे दारूकाम व आताष बाजी दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कलाकारांच्या हजेर्या ,कुस्ती हंगाम हे कार्यक्रम या वर्षी रद्द करण्यात आले आहेत. धार्मिक कार्यक्रम वगळता इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसल्याने यात्रा उत्सव अतिशय साधेपणाने पार पडणार आहे यात्रा उत्सवानिमित्त मंदिराच्या कळसावर व मंदिराच्या सभागृहात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गाभार्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मास्क लावून मंदिरात प्रवेश करणे, सॅनिटायझर चा वापर करणे व सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करावे असे आव्हान कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment