कोल्हार ( प्रतिनिधी ) :- प्रा.साईप्रसाद कुंभकर्ण पद्मश्री विखे पाटील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर उद्या (ता. १८ जुलै) एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण कक्ष अंतर्गत करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्दिष्ट म्हणजे महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी जागरूकता वाढवणे, त्यांना आत्मनिर्भरतेकडे प्रवृत्त करणे व सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन करणे होय. या कार्यक्रमास मा.जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुष्मिता विखे पाटील व प्रमुख अतिथी म्हणून डॉ.संजय कळमकर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.राम पवार यांनी दिली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थिनी आणि स्थानिक महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. ही कार्यशाळा सकाळी 10 वाजता सुरू होणार असून युवती व महिलांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post