संगमनेर :
कोव्हीड संकटाच्या काळात जे तुमचे झाले नाहीत, ते आता तरी तुम्हाला जवळ कसे करतील, ४० वर्षात यांनी या तालुक्याला फक्त धाक आणि दडपशाही दिली. विकासाच्या नावाखाली फक्त स्वतःला मिरवून घेतले. युवकांना रोजगार आणि गावांना पाणी देवू न शकणाऱ्यांना या निवडणूकीत धडा शिकवा. हा तालुका दहशतमुक्त करण्याचा निर्धार करा, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या निवडणूक प्रचारार्थ सावरगावतळ आणि पेमगिरी या ठिकाणी आयोजित केलेल्या प्रचार सभेत मंत्री विखे पाटील यांनी पुन्हा एकदा आ. थोरात यांच्या निष्क्रीयतेवर बोट ठेवून, त्यांच्या कोणत्याही भूलथापांना आता बळी पडू नका, असे आवाहन केले.
संगमनेर तालुक्याची परंपरा आहे, तालुक्यातील सत्ताधाऱ्यांच्या निवडणूका अडचणीत आल्या की, त्यांची धाकदडपशाही सुरु होते. यापुर्वीही झालेल्या कारखाना आणि विधानसभेच्या निवडणूकीत यांनी दहशतीनेच विजय मिळविले आहेत. यंदा तर त्यांना आता जनता थारा द्यायलाही तयार नाही त्यामुळेच आता नातेवाईक, मित्र आणि सर्वसामान्य माणसांची आठवण झाली आहे. प्रत्येकाच्या घरी जावून दबाव आणण्याचे काम सुरु झाले आहे. पण आता
आपला स्वाभिमान जागृत करुन, या तालुक्यात परिवर्तन घडवा, असेही त्यांनी आपल्या भाषणातून सुचित केले. ही निवडणूक कारखान्याची नाही, विधानसभेचे आहे.
चाळीस वर्षांच्या वाटचालीत आजपर्यंत फक्त दिशाभूल करण्याचे काम झाले, खोटी आश्वासने दिली गेली. औद्योगिक वसाहतीत तीस हजार युवकांना रोजगार दिल्याचा दावा करतात, हा कोणाला तरी पटण्यासारखा आहे का? असा प्रश्न उपस्थित करुन, जिथे उद्योगच आणले नाहीत तिथे रोजगारच तरी कसा उपलब्ध होणार. यांच्या सहकारी संस्था सोडल्या तर, रोजगाराची कुठलिही साधनं निर्माण करु शकले नाही हेच यांचे मोठे अपयश असल्याची टिका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
संगमनेर दहशतमुक्त करण्याचा निर्धार करा: पालकमंत्री विखे पाटील
टीम नगरी वार्ता
0
Comments
Post a Comment