पद्मश्री विखे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय प्रवरानगर लोणी येथे दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी महिलांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान महाविद्यालयातील महिला सक्षमीकरण कक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आले. यावेळी इंटरनॅशनल मार्केटिंग कार्पोरेशन चे चेअरमन श्री. रावसाहेब कोल्हे बोलत होते त्यांनी आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे व आपल्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळे हर्बल प्रोडक्ट्स म्हणजे आयुर्वेदिक साबण, स्त्रि तुलसी अर्क सॅनिटरी नॅपकिन, आयुर्वेदिक टालकम पावडर. इत्यादी आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेत हे डेमो देऊन सांगितले व मार्केटमध्ये मिळणाऱ्या रासायनिक प्रॉडक्ट पासून आपण सावधगिरी बाळगावी व त्यामुळे होणाऱ्या कॅन्सर सारख्या आजारांना निमंत्रण देऊ नये असे सांगितले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. छाया गलांडे मॅडम यांनी मांडले, प्रमुख पाहुण्यांची ओळख महाविद्यालयातील महिला सक्षमीकरण कक्षाच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पलघडमल यांनी करून दिली व आभार डॉ.रंजना दिघे यांनी मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरभी भालेराव यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.भाऊसाहेब रणपिसे सर हे होते. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व महिला प्राध्यापक बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ.पी.एम. दिघे सर व उपप्राचार्य डॉ. अनिल वाबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा महिला सक्षमीकरण कक्षाच्या उद्घाटनाचा व व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
Post a Comment