कोल्हार वार्ताहर (प्रमोद कुंभकर्ण )-
आई वडिलांची सेवा, गुरुजनांचे आशीर्वाद,मोठ्या व्यक्तीची प्रेरणा व प्रामाणिकपणाने केलेले कर्म आपल्याला जीवनात यशस्वी बनवते असे प्रतिपादन वृंदावन येथील कलाकार अजय कुमार सिसोदिया यांनी नगरी वार्ताशी बोलताना व्यक्त केले. नुकत्याच संपन्न झालेल्या ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा सोहळा प्रसंगी वृंदावन येथून आलेल्या अजय कुमार सिसोदिया उर्फ कृष्णकुमार यांनी भागवत कथेदरम्यान सादर केलेले "शिवतांडव नृत्य" व "मयूर नृत्याने उपस्थित असलेल्या हजारो भाविकांचे मने जिंकून घेतलीनृत्य अविष्कार सादर झाल्यानंतर कृष्णकुमार यांनी नगरी वार्ताशी संवाद साधला.
दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या अजय कुमार यांना लहानपणापासून नृत्याची आवड होती. नृत्य करणे निपुण होण्यासाठी देव सदैव प्रयत्नशील असत त्यांचे वडील राजकुमार सिसोदिया व आई शारदा देवी यांची कृष्णकुमार यांनी जोपासलेल्या या कडेला चांगली साथ मिळाली. नवरात्र उत्सवात सादर होणाऱ्या "रामलीला "या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी दहाव्या वर्षी पहिल्यांदी नृत्याचे सादरीकरण केले. रामलीला,कृष्ण लीला,व रासलीला या कार्यक्रमातून त्यांनी अभिनयाबरोबरच नृत्याचे धडे घेतले व दिल्ली पंजाब हरियाणा या ठिकाणी विविध कार्यक्रमही केले. व हळूहळू अजय कुमार सिसोदिया यांचे नावलौकिक झाले. श्रीरामपूर येथे महंत रामगिरी यांच्या भागवत कथेच्या सोहळ्याप्रसंगी त्यांनी नृत्याचे सादरीकरण केले आणि महंत रामगिरी यांचे आशीर्वाद व दाद मिळवली.
रामलीला कार्यक्रमातून माझे जीवन घडले. आपल्या आई- वडिलांची सेवा व आज्ञा पालन तसेच दुसऱ्या प्रती आदर ठेवल्यास मनुष्य जीवनात निश्चितच यशस्वी होतो. अजय कुमार सिसोदिया उर्फ कृष्णकुमार एक चांगले मेकअप आर्टिस्ट देखील आहेत. आपली नृत्यकला टीव्ही चॅनलवर सादर करण्याचा त्यांचा मानस आहे. मला यशस्वी होण्यासाठी सर्वांचे प्रेम, शुभेच्छा व आशीर्वाद मिळावी हीच अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आपल्या आई- वडिलांची सेवा व आज्ञा पालन तसेच दुसऱ्या प्रती आदर ठेवल्यास मनुष्य जीवनात निश्चितच यशस्वी होतो.-अजय कुमार सिसोदिया उर्फ कृष्णकुमार
टीम नगरी वार्ता
0
Comments
Post a Comment