कोल्हार( वार्ताहर ) - साईप्रसाद कुंभकर्ण
श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपुर येथील कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्टच्या अध्यक्षपदी सयाजी रघुनाथ खर्डे तर उपाध्यक्षपदी साहेबराव सखाराम दळे तर सचिव म्हणून संपत कापसे व खजिनदार म्हणून डॉ. भास्करराव खर्डे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मंगळवारी दुपारी झालेल्या विश्वस्तांच्या बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली. गेल्या दोन महिन्यापूर्वी देवालय ट्रस्टवर नवीन विश्वस्त मंडळाची निवड करण्यात आली होती. याप्रसंगी कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्टचे नवीन विश्वस्त संभाजी रघुनाथ देवकर विजय माधवराव निबे, लक्ष्मण बाळासाहेब खर्डे, सौ. शितल सुरेंद्र खर्डे ,अजित रमेश मोरे, सुजित लक्ष्मण राऊत ,जनार्दन सर्जेराव खर्डे, चंद्रभान आप्पासाहेब खर्डे, सर्जेराव सोन्याबापू खर्डे, नानासाहेब दगडू कडसकर,वसंत नानासाहेब खर्डे वसंतराव मोरे ,श्रीकांत खर्डे, स्वप्निल निबे, गोरख खर्डे ,पंढरीनाथ खर्डे आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. भास्करराव खर्डे म्हणाले की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील तसेच देवालय ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष सयाजी उर्फ भाऊसाहेब रघुनाथ खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन विश्वस्त मंडळ व पदाधिकारी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचा कारभार अतिशय उत्तम प्रकारे करतील. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा खा.डॉ.सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Post a Comment