कोल्हार प्रतिनिधी : साईप्रसाद कुंभकर्ण 

 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतूदीनुसार लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील ६ प्राध्यापकांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासमंडळांवर निवड झाल्याची माहीती प्राचार्य डाॅ.प्रदिप दिघे यांनी दिली. यामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत अकौंटन्सी अभ्यास मंडळावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब ज्ञानेश्वर रणपिसे, बँकिंग, फायनान्स अॅण्ड इन्शुरन्स अभ्यासमंडळावर डॉ. विजय दामोदर निर्मळ, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत इलेक्ट्रॉनिक सायन्स अभ्यास मंडळावर डॉ. नितीन देवराम साळी जिऑग्राफी अभ्यास मंडळावर डॉ. अनिल अशोक लांडगे, फिजीक्स अभ्यास मंडळावर डॉ. रामनाथ आप्पासाहेब पवार तसेच मानव विज्ञान विद्याशाखेअंतर्गत मराठी विषयाचे अभ्यास मंडळावर डॉ. शांताराम बबनराव चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्व शिक्षक महाविद्यालयामध्ये अतिशय तळमळीने शिकविणारे आणि नेहमीच विद्यार्थी केंद्रबिंदु माणून सतत कार्यरत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय आहेत. विद्यार्थ्यांना नेहमीच नवनवीन काहीतरी देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो असे प्राचार्य डॉ. प्रदिप दिघे यांनी सांगितले. नुकतेच केंद्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू केले असून नवीन शैक्षणिक धोरण यशस्वीपणे राबविण्यासाठी या शिक्षकांच्या ज्ञानाचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब सारंगधर म्हरके पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी अभ्यास मंडळावर निवड झालेल्या प्राध्यपकांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post