कोल्हार बातमी : साईप्रसाद कुंभकर्ण

  टायगर ग्रुपचे लोणी व प्रवरा परिसर अध्यक्ष अण्णाभाऊ ब्राम्हणे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन काल पार पडले. टायगर ग्रुपच्या वतीने गंगाधर बाबा छात्रालय गुहा येथे सुमारे ७० अनाथ मुलांना मोफत भव्य अन्नदान करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. दरवर्षी टायगर ग्रुपच्या वतीने या संयुक्त जयंतीच्या आयोजन केले जाते. आणाठाई खर्चाला फाटा देत आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे टायगर ग्रुप लोणी व प्रवरा शहर अध्यक्ष अण्णा भाऊ ब्राह्मणे यांनी या उपक्रमाविषयी सांगितले. या उपक्रमाचे आयोजन टायगरग्रुपचे संस्थापक वस्ताद जालिंदर भाऊ जाधव ,राष्ट्रीय अध्यक्ष पहिलवान डॉ तानाजी भाऊ जाधव ,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष बंटी भाऊ भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post