लोणी प्रतिनिधी- (गणेश कुंभकर्ण )
प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबिर गोगलगाव तालुका राहता,जिल्हा अहमदनगर, येथे दिनांक २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले होते.
दिनांक २२ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मा.सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. "युवकांच्या ध्यास ग्राम शहर विकास", महिला सक्षमीकरण, मतदार जनजागृती, वृक्षरोपण, स्वच्छता यांची माहिती शालीनीताईंनी शिबिरार्थ्यांना दिली.
शिबिर कालावधी अंतर्गत दिनांक 22/2/2023 रोजी प्रा. रमेश सरोदे यांचे "इतिहासातून व्यक्तिमत्व विकास" विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
दिनांक 23/2/2023 रोजी डॉ.अनंत केदारे यांचे "सक्षम युवा समर्थ भारत"
दिनांक 24/2/2023 रोजी डॉक्टर नवनाथ शिंदे यांचे "वाचन संस्कृती काळाची गरज",
दिनांक 25/2/2023 रोजी चि.अक्षय कासार यांचे "शिवचरित्र" व
दिनांक 26/2/2023 रोजी कु.प्राजक्ता मुरगे यांच "महिला सक्षमीकरण" या विषयावर प्रबोधन-व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
ग्राम स्वच्छता, निर्मल ग्राम, महिला सक्षमीकरण, नव मतदार जनजागृती, वृक्षरोपण, राष्ट्रीय एकात्मता, आरोग्य जनजागृती सारखे सामाजिक मुद्दे शिबिरार्थ्यांनी पथनाट्य व ग्रामीण भागाच्या सर्वे च्या माध्यमातून गावात राबविले.
महाविद्यालयीन परिसर, श्री स्वामी समर्थ केंद्र गोगलगाव, स्मशानभूमी, श्री शनी टेकडी परिसर इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहीम शिबिरा अंतर्गत राबविण्यात आली.
शिबिराचा निरोप समारंभ माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील च्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी गोगगलगाव चे सरपंच भाऊसाहेब रखमा खाडे पाटील उपस्थित होते. शिबिरात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.या ठिकाणी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम गुल्हाने, एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एस तुरकणे, प्रा.एस.डी अनाप, एन.एस.एस विद्यार्थी प्रतिनिधी चि. विशाल पाटील महिला प्रतिनिधी कु.नेहा शिंदे, ग्रामस्थ ,शिक्षक वृंद व एन.एस.एस शिबिरार्थी उपस्थित होते.
पुढच्या वर्षी अधिक उत्साहाने आम्ही काम करून गावाच्या सामाजिक समस्या सोडवू अशी ग्वाही प्राचार्य डॉ.एस.एम गुल्हाने यांनी दिली.
Post a Comment