यावर्षी महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडणार असल्याचा दिलासादायक अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नगरी वार्ताशी बोलताना व्यक्त केला .
नुकतेच एका टीव्ही चॅनलवर यावर्षी एल निनो मुळे महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असल्याबाबत सांगितले या पार्श्वभूमीवर हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्याशी भ्रमणध्वनी करून संवाद साधला असता त्यांनी हे दिलासादायक वृत्त दिले. पंजाबराव म्हणाले एल निनो डिसेंबर महिन्यात उद्भवतो व आपल्याकडे पाऊस हा जून महिन्यात सुरू होतो त्यामुळे एल निनो च्या अगोदरच महाराष्ट्रात पाऊस पडून जाणार असल्याने शेतकऱ्यांनी चिंता करू नये असे सांगून पंजाबराव म्हणाले यावर्षी महाराष्ट्रात आठ जून रोजी मान्सूनचे आगमन होणार आहे 22 जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. जून पेक्षा जुलै सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जास्त पाऊस पडणार आहे.
तर या महिन्यात 15 मार्चपासून
18 मार्चपर्यंत असे चार दिवस जोरदार पाऊस पडणार आहे. शेतकरी बांधवांनी गहू हरभरा काढून घ्यावा असे आवाहनही पंजाबराव यांनी नगरी वार्ताच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केले आहे.
Post a Comment