कोल्हार वार्ताहर - (साईप्रसाद कुंभकर्ण/गणेश कुंभकर्ण )
कासार समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडून कासार समाजाची ओळख शासन दरबारी निर्माण करून देण्या कामी कासार समाज बांधवांनी संघटित होऊन लढा देण्याची गरज आहे. ज्यांना आम्ही बोलवतो तेयेत नाही व जे येतात ते आम्हाला साथ देत नाही अशी खंत व्यक्त करीत सर्व मतभेद विसरून समाज संघटित करून प्रत्येकाने समाजाच्या प्रगतीसाठी तन-मन-धनपुर्वक कार्य करावे असे प्रतिपादन कासार समाज मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरद भांडेकर यांनी केले .मानवता चॕरीटेबल ट्रस्ट च्या वतीने आयोजित शिष्यवृत्ती वाटप व कोरोना निधी वाटप कार्यक्रम प्रसंगी भांडेकर बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत कोळपकर होते .यावेळी शिर्डी चे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर टीम संवादचे प्रमुख गोविंद अंधारे राहुरीचे नगराध्यक्ष अनिल कासार ,प्रकाश तवटे, दास कुंभकर्ण, मानवता चॕरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सौरभ कोळपकर ,आशिष निंनगुरकर प्राध्यापक चंद्रकांत खांडगौरे डॉक्टर स्मिता होटे नंदकुमार कोळपकर ,संगीत कुमार डोळ, जगदीश कुंभकर्ण शशिकांत कडुसकर ,ॲड. हेमंत कासार ,अरुण वेळापूरे ,संदीप अक्कर, राहुल कोळपकर, संतोष धुमाळ, रामभाऊ शिरापुरे ,मंगेश विभुते ,निशिकांत धुमाळ अनिल कोळपकर सतीश कुंभकर्ण सुधीर होटे,राणी खांडगौरे अनिल अंभोरे दिपक कुंभकर्ण पत्रकार प्रमोद कुंभकर्ण आदीसह समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रकाश तवटे म्हणाले की समाजात काम करताना समाजाला मार्गदर्शक ठरेल असेच मार्गदर्शन समाजासाठी महत्त्वाचे असते समाजासाठी आपण काहीतरी करू त्यावेळेस आपली वाटचाल योग्य दिशेने असे समजावे संघटनेने आपल्या साठी काहीतरी करावे असे वाटत असताना संघटनेला सहकार्य अपेक्षित आहे . टिमसंवादचे प्रमुख गोविंदराव अंधारे यांनी यांनी यावेळी मिशन प्रशासन बद्दल माहिती देऊन मिशन प्रशासनाच्या माध्यमातून समाजातील अनेक युवक-युवतींना मार्गदर्शनाचे अविरत काम सुरू असुन समाजातील अनेक व्यक्ती विविध पदावर अधिकारी म्हणून काम करीत आहे मिशन प्रशासनाच्या वतीने लवकरच दत्तक योजना सुरु करण्यात येणार असल्याचे गोविंदराव अंधारे यांनी सांगितले कार्यक्रमाच्या प्रारंभी कालिका माता व संत आडकोजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यातआले. मानवता चॕरीटेबल टेबल ट्रस्टच्यावतीने प्रियंका डंबाळे यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती व रोहिणी संजय डंबाळे यांना आपत्कालीन मदत देण्यातआली यावेळी प्राध्यापक चंद्रकांत खांडगौरे व डॉक्टर स्मिता होटे लिखित समाज विभुषण या पुस्तकाचे प्रकाशन मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरद भांडेकर व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशिकांत धुमाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन नंदकुमार कोळपकर यांनी केले.
कासार समाजाच्या प्रगतीसाठी समाजबांधवांनी मतभेद विसरुन संघटीत पणे कार्य करावे-शरद भांडेकर
टीम नगरी वार्ता
0
Comments
Post a Comment