सात्रळ प्रतिनिधी- ( साईप्रसाद कुंभकर्ण / गणेश कुंभकर्ण ) तीन टप्प्यात एफ आर पी देण्याचा सरकारने घाट घातला आहे, त्यावरून शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनात संभ्रम तयार व्हावा म्हणून एफ आर पी एक टप्प्यातच देणार असल्याचे खोटे आश्वासन केंद्र सरकार देत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केला आहे. या विषयावर 12 तारखेला टाकळीमिया येथे मा. खा. राजू शेट्टी यांची सभा होणार आहे, या सभेची माहिती देण्यासाठी तसेच एफ आर पी तुकडीकरणाला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटनेने सात्रळ येथे चौकसभा घेतली. यावेळी प्रकाश देठे यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. शेतकरी संघटनेने दिलेल्या 8448183751 या नंबरवर मिस कॉल देऊन आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. 

 यावेळी बोलताना युवा नेते पंकज कडू पा. यांनी लखीमपूर येथील शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेचा निषेध केला, तसेच एफ आर पी बाबत शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला उपास्थित शेतकऱ्यांच्या वतीने पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. यावेळी रवींद्र कडू पा. सात्रळ सोसायटीचे चेअरमन योगेश चोरमुंगे पा., माजी उपसरपंच गणेश कडू, रघुनाथ नालकर, सूर्यभान दिघे, धानोरेचे उपसरपंच पोपटराव दिघे, नामदेवराव पलघडमल, भाऊसाहेब पलघडमल, सतीश शिंदे, रंजय कडू, चांगदेव शिंदे, राजेंद्र शिंदे, दत्तात्रय सिनारे, राजेंद्र कडू, कैलास पलघडमल, संदिप वाकचौरे, संतोष पलघडमल, अमोल कडू, अरुण दिघे, अक्षय धनवटे, गुरू वामन आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आदिनाथ दिघे यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post