कोल्हार वार्ताहर -(साईप्रसाद कुंभकर्ण)
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामविकास विभागाच्या पंतप्रधान ग्रामसडक योजना या खात्याकडे राज्यातील कंत्राटदाराचे हजारो कोटीचे बिल प्रलंबित आहेत अनेक वेळा पाठपुरावा करूनही देखील कोवीडच्या नावाखाली हे देयके निघत नाही त्याच्या निषेधार्थ बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने संपूर्ण राज्यभर उद्या एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वअधीक्षक अभियंता कार्यालयावर जाऊन धरणे आंदोलन करणार आहे या आंदोलनात राहाता तालुक्यातील कंत्राटदार व इतर संघटनांचे सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहन लोणी येथील कॉन्ट्रॅक्टर दिपक धावणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे .धावणे यांनी पत्रकात म्हटले आहे शासनाकडून देयकमिळत नसल्याने कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले असून बँकेचे कॅश क्रेडीट कर्जकाढून त्यांनी बांधकाम मटेरियल खरेदी केले बँक मार्फत खरेदी केलेल्या मशनरी चे हफ्तेथकल्यामुळे बँकेच्या नोटिसा आल्या आहेत आता तर पेंडिंग कामे करण्यासाठी निधी उपलब्ध नाही व कामगारांचे पगार थकले आहे शासनाने कंत्राटदाराचे देयके दिले नाही तर कंत्राटदार कामगारांना काय देणार त्यामुळे कामगारांची दिवाळी सुद्धा होणार नाही तेव्हा शासनाने कंत्राटदाराचे देयक द्यावे अशी मागणी दिपकधावणे यांनी पत्रकात केली आहे.
Post a Comment