राहाता प्रतिनिधी ( साईप्रसाद कुंभकर्ण ) :-
वादग्रस्त वक्तव्य करत नेहमी देशातील वातावरण दूषित करून प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या गीतकार जावेद अख्तर यांनी काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व परिवारा विषयी वादग्रस्त वक्तव्य क्रूर आतंकवादी संघटना तालीबानशी तुलना केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध देशभरात विविध शहरात आंदोलने सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा ओबीसी मोर्चा राहाता तालुक्याच्या वतीने जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला "जोडेमारो आंदोलन" करण्यात आले. व त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी ही मागणी आज शिर्डीच्या उपविभागीय प्रांतधिकारी यांना भाजपा ओबीसी मोर्चा राहाता तालुक्याच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी शिर्डीचे नगराध्यक्ष श्री शिवाजी गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हें आंदोलन पार पडले. यावेळी त्यांनी सांगितले की रा. स्व. संघ व परिवाराला सातत्याने बदनाम करून आपली पोळी भाजण्याचा कुटील डाव जावेद अख्तर यांच्या कडूनं होत असतो, त्यांनी केलेल्या वक्ताव्याचा आम्ही निषेध करतो. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष स्वानंद रासने यांनी केले. त्यांनी पुढे बोलतांना सांगितले कीं देशावर आलेले कुठलेही राष्ट्रीय किंवा नैसर्गिक संकट मग ते भूकंप, सुनामी, महापूर असो वा मनावतेवर आलेले संकट ते सोडवण्यासाठी आदेशाची वाट नं पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व परिवाराचे कार्यकर्ते सर्वप्रथम त्या विपदास्थळी उपस्थित होता व देशावर आलेले संकट संपत नाहीं तो पर्यंत संघ स्वयंसेवक आपले पाय रोवून उभे असतात. जगातील सर्वात मोठ्या सेवाभावी, देशभक्त अश्या या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व बजरंगदल या संघटनांची तुलना मानवतेला कलंक असलेल्या तालीबान या आतंकवादी संघटने बरोबर करणाऱ्या जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा निषेध भाजपा ओबीसी मोर्चा राहाता तालुक्याच्या वतीने जावेद अख्तर यांच्या प्रतिमेले जोडे मारून त्यांच्या विरोधात घोषणा देऊन करण्यात आला.
सदर आंदोलनासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र गोंदकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी श्री रवींद्र गोंदकर, भाजपचे जेष्ठ नेते श्री रमेश बिडये, जिल्हा संयोजक श्री राजेश शर्मा, श्री रवींद्र गोंदकर युवा मोर्चा शहरध्यक्ष श्री योगेश गोंदकर, माजी नगरसेवक श्री किरण बरडे, युवा मोर्चाचे श्री गणेश जाधव, श्री नरेश सुराणा, श्री सोमराज कावळे, श्री साईराज कोते, श्री सुभाष यादगुडे जिल्हा सरचिटणीस श्री सचिन भैरवकर, ओबीसी संपर्क प्रमुख श्री वैभव शिंदे, श्री नितीन वाके, श्री नंदलाल मोटवानी श्री सुनिल भुजाडे, सरचिटणीस श्री भिमराज मुर्तडक, उपाध्यक्ष श्री योगेश शिंदे श्री बद्रीनाथ वाघचौरे, श्री चेतन कोते, प्रसाद शेलार, श्री अक्षय मुळे, श्री सोमनाथ शिंदे,श्री विजय कोळपकर, श्री दत्तात्रय झाकणे, श्री रोहित सोळंकी, श्री आनंद बुधेकर, श्री सुनिल गोर्डे, श्री योगेश मोटवानी, साईनाथ शिंदे ,श्री संजय महाजन तसेच भाजपा व हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी भाजपा ओबीसी मोर्चाचे श्री वैभव शिंदे, श्री नितीन वाके, श्री विजय राहाते यांनी विशेष प्रयत्न केले तर उपस्थितांचे आभार संजय महाजन यांनी मानले.
Post a Comment