कोल्हार वार्ताहर (साईप्रसाद कुंभकर्ण / गणेश कुंभकर्ण ) -
राहाता तालुक्यातील लोणी-संगमनेर रोड वर चंद्रपुर बस स्टॉप समोर पेट्रोलिंग करीत असताना लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांना एक संशयास्पद वाटत असलेल्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले अशी माहिती लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी दिली
या घटनेची माहिती त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांना दिली असता ते सुद्धा तात्काळ लोणी येथे आले आणि पंचनामा केला असता तब्बल 510 किलो गांजा मिळून आल्याने नगर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याची चर्चा आहे .यावेळी पोलिस अधिक्षक मनोज पाटील,अ.पो.अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांच्यासह पोलिस नाईक दीपक रोकडे,पो.हे. कॉन्स्टे.राजेंद्र औटी,सहा.फौजदार बाबासाहेब लबडे,संपत जायभाये,कैलास भिंगारदिवे,संभाजी कुसळकर,मनोज सनानसे,संतोष लांडे,सोमनाथ वढणे,बाबासाहेब सांगळे, पी. एन.इंगळे,पी. एन.शिंदे या पोलिस पथकाने हि धडकेबाज कारवाई केली असुन या सदर कारवाईमुळे लोणी पोलिसांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Post a Comment