कोल्हार (वार्ताहर) : साईप्रसाद कुंभकर्ण
संसारा बाबत असलेली आसक्ती प्रेम ,माया सोडून केलेली मनोभावे भक्ती देवाला आवडते संसाराचा भार परमेश्वरचरणी वाहून चित्तसमाधानी ठेवावे बालपण संस्काराने शोभते तरुण पण कीर्तन प्रवचनाने शोभते तर म्हतारपण भजनाने शोभते असे प्रतिपादन भागवताचार्य ह.भ.प.संदीप महाराज चेचरे यांनी केले. कोल्हार येथील शिवाजीनगर उपनगरात छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळाच्या वतीने आयोजित भागवताचार्य ह.भ.प .संदीप महाराज चेचरे यांचे प्रवचन आयोजित केले होते त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते यावेळी विठ्ठल बेद्रे, एकनाथ येवले ,जालिंदर रोडे ,भाऊसाहेब चेचरे ,रवि चेचरे बाळासाहेब चेचरे ,मयूर तिवाटणे, बाबासाहेब कपाटे ,पत्रकार साईप्रसाद कुंभकर्ण ,शाकीर शेख ,अनिल राजभोज ,सयाजी राजभोज सुभाष वैष्णव ,संजय वैष्णव ,प्राचार्य एस्. के.सोनवणे ,विजय लांबोळे, प्रमोद चित्ते ,आप्पा कोळपकर, अशोक साळुंके आदीसह शिवाजीनगर मधील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ह.भ.प.संदिप महाराज चेचरे भाऊसाहेब चेचरे, रवि चेचरे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन छत्रपती गणेश मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रमोद कुंभकर्ण डॉ श्रीकांत बेंद्रे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राचार्य एस् .के.सोनवणे यांनी केले.
Post a Comment