कोल्हार वार्ताहर-(साईप्रसाद कुंभकर्ण व गणेश कुंभकर्ण) सात्रळ येथील रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (एन.एम.एम.एस) शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. इ.८ वी चे विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट होतात. सन-२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात विद्यालयातील १३ विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेला उत्तीर्ण झाले असून त्यापैकी ३ विद्यार्थी शिष्यवृत्ती ला पात्र ठरले आहे.केंद्रसरकार मार्फत दिली जाणारी व विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी ही शिष्यवृत्ती परीक्षा आहे. पात्र ठरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास ४८०००/- हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. यात विद्यालयातील अनुक्रमे विद्यार्थी-१.कोहकडे कुणाल चंद्रकांत २. अंत्रे ओमकार ज्ञानेश्वर ३.फणसे पुष्कर भालचंद्र हे ३ विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र ठरले आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांचे,विभागप्रमुख श्री.एस.डी दिघे, मार्गदर्शकशिक्षक श्री.एस.एस झावरे,श्री.बी.डी कोहकडे,श्री.एस.बी बर्वे, श्री.टी.एस.राशिनकर, गुरुकुल सहायक श्री. पी.बी.कुलथे, गुरुकुलप्रमुख श्री. व्ही.बी.गभाले शिक्षकांचे प्राचार्य अशोकराव वानखेडे सर,पर्यवेक्षक सिताराम बिडगर यांनी अभिनंदन केले. तसेच रयत शिक्षण संस्थेचे, उपाध्यक्ष मा.अरुण कडू पाटील, उत्तरविभागीय अध्यक्ष मा.आ.आशुतोषजी काळेसाहेब,विभागीयअधिकारी श्री.कण्हेरकर सर सहाय्यक विभागीय अधिकारी श्री.वाळुंजकर सर आणि श्री. तापकीर सर, स्कूल कमिटी सदस्य, अ‍ॅड.विजयराव कडू पाटील, संभाजीराव चोरमुंगे पाटील, बबनराव कडू,भास्करराव फणसे, किशोर भांड डॉ.बोरा, युवा नेते किरण कडू , पंकज कडू, विक्रांत कडू, गणेश कडू,भाऊसाहेब पेटकर, सर्व ग्रामस्थ पालक, व शिक्षणप्रेमी मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post