सात्रळ प्रतिनिधी- (साईप्रसाद कुंभकर्ण/गणेश कुंभकर्ण) लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या प्रवरा कोविड केअर सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल होत असलेल्या रुग्णांच्या मदतीकरिता सामाजिक उत्तरदायित्व भान जागृत ठेवून लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील ( पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ येथील शिक्षक व शिक्षकेतर सेवकाकडून प्रवरा कोविंड सेंटर करिता रक्कम रुपये 56,404 रू. किंमतीचे मॉनिटर स्टॅन्ड व बेड साईड स्क्रीन इत्यादी वैद्यकीय उपकरणांची मदत करण्यात आली. यावेळी माजी मंत्री आमदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, सात्रळ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. सोमनाथ घोलप,उपप्राचार्य प्रा.दीपक घोलप, डॉ. किरण आहेर, डॉ धनंजय धनवटे, डॉ निलेश पारखे, प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, डॉ.भाऊसाहेब नवले, कार्यालयीन अधिक्षक श्री. विलास शिंदे, श्री. महेंद्र तांबे उपस्थित होते. कोरोना संकटाला धाडसाने तोंड देत मानवतेचे कर्तव्य बजावताना सात्रळ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या दहा स्वयंसेवकांच्या टीमने स्वतः मास्क बनवून त्याचे गरजू ग्रामस्थांना वितरण करून 'शूरयोद्धे' म्हणून सात्रळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या मदतीकरिता अविरात कार्यरत आहेत, अशी माहिती रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. रोहिदास भडकवाड यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post