लोणी प्रतिनिधी -(साईप्रसाद कुंभकर्ण /गणेश कुंभकर्ण )
कोविडच्या दुसऱ्या लाटेत अ.नगर जिल्ह्यातील रुग्णसंख्येत वाढ होत असताना आ.राधाकृष्ण विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुक्यातील लोणी येथे प्रवरा कोव्हिड सेंटर सुरु करण्यात आले.
ह्या कोविड सेंटर मध्ये उपचार सुरु असलेल्या रुग्णांना मदत म्हणून सामाजिक बांधिलकीने दाढ बु. येथील श्रद्धा ग्राम विकास प्रतिष्ठानच्या वतीने ५१ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश आ.राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला.
याप्रसंगी विखे पाटील कारखान्याचे व्हा.चेअरमन विश्वासराव कडू ,प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश तांबे,रविंद्र बनसोडे, नानासाहेब तांबे ,राजाराम निमसे गणेश निमसे,संतोष वाणी, सुनिल तांबे ,दिपक धावणे, शिवदास बनसोडे, भगवान गाडेकर सोनवणे आदी उपस्थित होते.
तसेच स्व.भारतदादा तांबे यांचे स्मरणार्थ १७ हजार ७७७ रुपयांचा धनादेश सुनिल भारत तांबे यांनी आ.विखे यांच्याकडे सुपुर्त केला.
मागील वर्षीही स्व.भारत दादा तांबे यांच्या स्मरणार्थ लॉकडाऊन मध्ये गोर-गरीब गरजुंना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले होते.
दाढ येथील श्रद्धा ग्राम विकास प्रतिष्ठान हे सामाजिक कार्यात अग्रेसर असते या प्रतिष्ठानच्यावतीने दाढ बु. येथील वापरायच्या पाण्याची पाईपलाईन ही गावातील विविध भागात प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आलेली आहे,गरीब गरजुंना किराणा सामानाचे वाटप तसेच मराठी शाळा शाळेसाठी लागणारे प्रोजेक्टर व आरोग्य विषयक कॅम्प , पाण्याचा टँकर अशा वेगवेगळे समाजउपयोगी कार्य प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.
श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानची कोविड सेंटर ला ५१ हजारांची मदत
टीम नगरी वार्ता
0
Comments
Post a Comment