​पुणे: 

 लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आज वैशाख पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर 'पुष्टीपती विनायक जयंती' (गणेश जन्म) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . या विशेष दिनाचे औचित्य साधून मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक 'शहाळे महोत्सव' आयोजित करण्यात आला होता. पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली. बाप्पाच्या मूर्तीसमोर आणि संपूर्ण सभामंडपात शहाळ्यांची (नारळांची) कलात्मक पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. हिरव्यागार शहाळ्यांच्या या सजावटीमुळे गाभारा अतिशय प्रसन्न आणि नयनरम्य दिसत आहे. ​ ​उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा महोत्सव साजरा केला जातो. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. ​पुष्टीपती विनायक जयंतीच्या निमित्ताने बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांसह राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच मंदिराबाहेर लांब रांगा पाहायला मिळत आहेत. "बाप्पाचे हे रूप पाहून मन प्रसन्न झाले," अशा भावना अनेक भाविकांनी व्यक्त केल्या.

Post a Comment

Previous Post Next Post