श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि पुण्यातील नामांकित लोकमान्य हॉस्पिटल्स (गोखले नगर रोड) यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकतेच एका ‘मोफत महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा पुणे शहर व परिसरातील अनेक गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे.
याच सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून, लोकमान्य हॉस्पिटल्सतर्फे आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया व हृदयविकारासंबंधित प्रोसिजर्स पूर्णतः मोफत करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
इतर वयोगटातील रुग्णांसाठीही माफक दरात उपचार
केवळ लहान मुलांसाठीच नव्हे, तर इतर सर्व वयोगटातील रुग्णांसाठी देखील या उपक्रमांतर्गत विशेष सवलत दिली जाणार आहे. यामध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हृदयविकाराच्या महागड्या उपचारांमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य रुग्णांना यामुळे खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
हॉस्पिटल प्रशासनाने एका महत्त्वाच्या बाबीवर प्रकाश टाकला आहे. लोकमान्य हॉस्पिटल्स (वेताळबाबा चौक, गोखले नगर, सेनापती बापट रोड, पुणे) हे रुग्णालय महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MPJAY) किंवा आयुष्मान भारत अशा कोणत्याही शासकीय आरोग्य योजनांमध्ये समाविष्ट नाही.
त्यामुळे येथे होणारे मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया या कोणत्याही शासकीय अनुदानावर अवलंबून नसून, विविध सामाजिक संस्था, ट्रस्ट आणि दानशूर व्यक्तींनी केलेल्या आर्थिक सहकार्यातून व दातृत्वातून शक्य केल्या जात आहेत.
📞 अधिक माहिती व संपर्कासाठी:
समाजातील जास्तीत जास्त गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व उपचारांपासून वंचित असलेल्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमान्य हॉस्पिटल्सच्या सोशल सर्विस डिपार्टमेंटचे प्रमुख व वरिष्ठ सल्लागार डॉ. अशोक घोणे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी रुग्णांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
पत्ता: लोकमान्य हॉस्पिटल्स, वेताळबाबा चौक, गोखले नगर, सेनापती बापट रोड, पुणे – ४११०१६.
संपर्क व्यक्ती: श्री. शरद काथवटे / सौ. प्रगती
मोबाईल नंबर: +91 77208 88881 / +91 98220 01643
Post a Comment